गाडी अडवून अज्ञातांचा रोहिणी खडसेंच्या वाहनावर हल्ला

Maharashtra Times 2021-12-27

Views 1

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. रोहिणी खडसे या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत होत्या. याचवेळी त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना सुदैवाने कसलीही दुखापत झालेली नाही. हल्ला केल्यानंतर काही क्षणातच हल्लेखोर फरार झाले. हे हल्लेखोर पाच जण असून त्यांच्याकडे लोखंडी रॉडसह शस्त्रे असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष पेटलाय. अशातच हा हल्ला म्हणजे नव्या वादाला तोंड फोडणारी घटना आहे. या हल्ल्यामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी तीव्र होताना दिसणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS