'मला एटीएसने टॉर्चर करुन योगी आदित्यनाथ, आरएसएसचं नाव घ्यायला लावलं'

Maharashtra Times 2021-12-28

Views 203

मालेगाव स्फोटातील साक्षीदाराने खळबळजनक खुलासा केलाय. एटीएसने मला टॉर्चर करुन योगी आदित्यनाथ आणि आरएसएसमधील काही नेत्यांची नावं घ्यायला लावली, असं या साक्षीदाराने म्हटलंय. या साक्षीदाराला मंगळवारी दुपारी एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्या वेळी सध्या वादात असलेले माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग हेच एटीएसचे अतिरिक्त आयुक्त होते. सप्टेंबर २००८ ला झालेल्या मालेगाव स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS