नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील पुरी गावात सकाळी सडे आठच्या सुमारास शेत गेट नंबर ४०९ मधील विहिरीत बिबट्या पडलेला आढळून आला. हे निदर्शनास येताच गावकऱ्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांची वाट न बघता विहिरीतील बिबट्यास बाहेर काढले. यासाठी त्यांनी खाटेचा वापर केला होता. दोरीच्या साहाय्याने गावकऱ्यांनी ही खाट विहिरीत सोडली असता बिबट्या या खाटेवर येऊन बसला. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी या बिबट्याला पिंजऱ्यात बंद करून त्याला वन आदिवासात सोडून देण्यात आले.
#wildlife #nashik #Leperd #maharashtra