Pune l आईला औषधांचा ओव्हरडोस देऊन खून करत मुलाची आत्महत्या lChild commits suicide by giving mother overdose of drugs l

Sakal 2022-01-02

Views 2

पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 42 वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या आईला औषधांचा ओव्हरडोस देऊन, त्यानंतर त्यांचा चेहरा प्लास्टिक पिशवीत घालून निर्घृण हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे.

गणेश मनोहर फरताडे आणि त्यांची आई निर्मला मनोहर फरताडे असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय आहे संपूर्ण प्रकार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनकवडी येथील एका सोसायटीमध्ये गणेश फरताडे आपल्या आईसह राहत होता. गणेश बेरोजगार होता तसेच त्याचे शेयर मार्केट मध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तसेच आईच्या आजारपणामुळे देखील तो त्रस्त होता या सगळ्या गोष्टीला कंटाळून मुक्ती मिळावी त्याने हे कृत्य केले, असं सांगण्यात येतंय. या घटनेची माहिती देतायत सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युनूस मुलानी

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS