आताच्या घडीला जगभरासह भारतातही ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे देशभरातील राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर निर्बंध अवलंबत आहेत. भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण कोरोना किंवा ओमायक्रॉन संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली असली, तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. देशभरातील रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण प्रचंड वाढते, तेव्हाच कोरोनाची लाट आली, असे म्हणता येते, असे सुप्रसिद्ध डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले. पाहा डॉ. रवी गोडसे यांची विशेष मुलाखत...