पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांचं उद्घाटनासाठी आज पंजाब दौऱ्यावर होते. मात्र, पंतप्रधान मोदींचा ताफा ज्या मार्गावरुन जाणार होता तिथे सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळली. पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मोदींना २० मिनिटे आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले.
तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’ अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केल्याचं समजतं. पंतप्रधान मोदींचा नियोजित दौरा काही कारणांमुळे रद्द केला असल्याचं केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी मंचावरून सांगितलं.