महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर वनविभागाकडून आदिवासींची दुकानं उद्ध्वस्त, नेमकं घडलं काय? पाहा...

Lok Satta 2022-01-09

Views 918

कोणताही ऋतू असूदेत महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखराकडे राज्यासह देशभरातील पर्यटकांचा कायमच ओढा असतो. सह्याद्री डोंगररांगांमधील हे सर्वात उंच शिखर सर करणं अनेक पर्यटकांचं स्वप्न असतं. पण, समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर उंचीवर असलेल्या या शिखरावर जाण्यासाठी ३ तासांचा खडतर ट्रेक करावा लागतो. अनेक ठिकाणी थांबत चहा, पाणी, लिंबू सरबत किंवा खाद्य पदार्थ घेत तहान-भूक शमवावी लागते. अहमदनगर जिल्ह्यातील बारी आणि जहांगीरवाडी गावची आदिवासी कुटुंबं पर्यटकांना याच खाद्यपदार्थांची विक्री करत उपजीविका करतात.

#Kalsubai #Bari #Akole #Ahmednagar #ForestDepartment

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS