आतापर्यंतची सर्वांत मोठी कोरोना आकडेवारी; राज्यात आज 44 हजारहून अधिक रुग्ण

Maharashtra Times 2022-01-09

Views 133

राज्यात आज तब्बल 44 हजार 388 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 15 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. राज्यात आज 207 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1216 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 454 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत आज 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. मुंबईत सध्या 1 लाख 17 हजार 437 रुग्ण सक्रीय आहेत. मुंबईत सध्या 1 लाख 17 हजार 437 रुग्ण सक्रीय आहेत. शिवाय राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS