Pune: देवतांच्या जुन्या मूर्ती, फोटो संकलित; पुण्यातील या उपक्रमात ५ टन सामान जमा

Sakal 2022-01-11

Views 13

घरात नको असलेल्या देवदेवतांच्या प्रतिमा, मूर्ती अनेकदा झाडाखाली व मंदिरांमध्ये ठेवलेल्या दिसून येतात. अनेकदा त्याची विटंबनादेखील होते. यावरून देवदेवतांच्या मूर्ती कुठे द्याव्यात? असा प्रश्न नागरिकांना नेहमीच भेडसावत असतो. या मूर्तीचं किंवा अन्य सामग्री च पावित्र्य जपावं या साठी पुण्यातील नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी देवदेवतांसंबंधित वस्तूंच्या संकलानाची मोहीम हाती घेतली. त्यासाठी नाशिकच्या संपूर्णम् संस्थेच सहकार्य लाभलं.
यावेळी मोठ्या प्रमाणात मूर्तींचे व फोटो फ्रेमचे संकलन करण्यात आले. या उपक्रमामध्ये देवादिकांच्या धातू, पीओपी च्या मूर्ती, पुतळे, देव्हारे, छाप, टाक, तसबिरी, जुन्या पोथ्या, धार्मिक ग्रंथ असे सुमारे ५ टन सामान जमा झाले. या उपक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नदीकाठी, मंदिराच्या पायऱ्यांवर, रस्त्याच्या कडेला या गोष्टी न येता, त्याचा पुनर्वापर व विघटन योग्य प्रकारे होण्याची गरज आहे, हाच या उपक्रमाचं हेतू. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्णमच्या प्रकल्प प्रमुख तृप्ती गायकवाड यांनी हातभार लावला.
#sculptures #idol #puneinitiative #frames #photos #godphotos #pune #punenews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS