जब प्यार किया तो डरना क्या असं म्हणत उज्वल भविष्याची स्वप्न पाहात त्या दोघांनी रितसर लग्न केलं...मात्र लग्न हाच त्यांच्या आयुष्यातला मोठा अडथळा ठरेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल....21 व्या शतकात माणूस पार चंद्रापर्यंत जाऊन पोहोचला सारं काही बदललं मात्र जाता जात नाहीय ती जात..या दोघांनी आंतरजातीय लग्न केलं हाच काय तो घरच्या लेखी यांचा गुन्हा....मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरच्यांची बदनामी केलीय त्यांना मारहाण केलीय असा या मुलाचा आरोप आहे