Shivaji Maharaj Statue: शिवसेनेने स्थापन केलेला छत्रपतींचा पुतळा प्रशासनाने मध्यरात्री काढला

Sakal 2022-01-17

Views 1

दर्यापूर शहरात चर्चेला उधाण
तणावाची परिस्थिती बघता दंगल नियंत्रण पथक दर्यापुरात दाखल
दर्यापूर शनिवारी रात्रीच्या सुमारास शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात दर्यापूर आतील पेट्रोल पंप चौकात प्रशासनाची परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नियोजित जागी स्थापन केल्यामुळे सर्वत्र पुतळ्या संबंधात राजकारण तापले होते या पुतळ्याच्या स्थापनेस पाठिंबा देण्यासाठी दर्यापूर आतील सर्वपक्षीय व सर्व संघटना नि प्रशासनाला निवेदने दिली होती मात्र विनापरवानगी पुतळा स्थापन केल्यावरून दर्यापूर प्रशासनाने नगरपालिका व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत काल रात्री दोन वाजता छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला आहे ही बातमी सकाळी वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरताच प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला असून दर्यापूर पोलिसांनी स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दंगा नियंत्रण पथकाला उपस्थित ठेवले आहे

दिनांक 15 चा रा त्री शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भागातील गांधी पुतळ्याजवळ पेट्रोल पंपाजवळ बसवला होता या घटनेची तातडीने दखल घेत दर्यापुरात अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते यावर दर्यापूर आतील सर्वपक्षीय व सामाजिक क्षेत्रातील संघटना एकत्र येत पुतळ्यास मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविण्यात आला होता व हा पुतळा हटवू नये अशी मागणी निवेदनातून प्रशासनाला करण्यात आली होती मात्र प्रशासनाने कोणाचेही न ऐकता काल रात्री दोन वाजताच्या दरम्यान मोठ्या पोलीस बंदोबस्तात पुतळा हटवला आहे यासह पुतळा बसवणाऱ्या गोपाल अरबट त्यांच्या पाच ते सहा सहकार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती सध्या स्थितीत त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे या घटनेची दखल घेत सर्वच स्तरावरून प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे यासह दर्यापूर आतील संवेदनशील भागात दंगा नियंत्रण पथक व पोलिस उपस्थित ठेवण्यात आले आहेत
#shivajimaharajstatue #shivajimaharaj #shivajimaharaj #daryapur

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS