Nashik l वीर जवान अमोल पाटील अमर रहे..नाशिक जिल्ह्यातील बोलठानमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Sakal 2022-01-17

Views 2

Nashik l वीर जवान अमोल पाटील अमर रहे..नाशिक जिल्ह्यातील बोलठानमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सशस्त्र सीमा दलाचे जवान अमोल हिंमतराव पाटील (30) यांचे पार्थिव देहावर आज(दि. 17) लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. बिहार-नेपाळ सीमेवरील बिरपूर येथे तैनात असलेले सशस्त्र सीमा दलातील जवान अमोल पाटील Amol Patil हे सहकार्‍यांसह सशस्त्र सीमा दलाच्या 45 व्या बटालियनचे कमांडंट एस.के. गुप्ता यांची बदली झाल्याने त्यांच्या निरोप समारंभासाठी उभारण्यात आलेला मंडप काढत होते. यावेळी मंडपाचा लोखंडी पाईप उच्चदाब वीजवाहिनीत अडकल्याने अमोल पाटील व इतर दोन सहकार्‍यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ओढवला. वीर जवान अमोल पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वन करण्यासाठी माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार आदी उपस्थित होते. शुक्रवारी घडलेल्या या घटनेचे वृत्त बोलठाण येथे येवून धडकताच सर्वत्र शोककळा पसरली. त्यांना श्रद्धांंजली अर्पण करण्यासाठी काल स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात येऊन ठिकठिकाणी अभिवादनाचे फलक लावण्यात आले. शहीद अमोल पाटील हे सहा वर्षापूर्वी सशस्त्र सीमा दलात नियुक्त झाले होते. दिवाळी सणासाठी ते बोलठाण येथे सुट्टीवर आले असता परत जातांना आई, पत्नी व 9 महिन्याच्या चिमुकलीसही सोबत घेऊन गेले होते. video - संजीव निकम

#Nashik #NashikNewsUpdates #NashikLiveUpdates #SoldierAmolPatil #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS