तुळजापूर (जि.उस्मानाबाद)(Osmanabad) : नांदुरी (ता.तुळजापूर) येथील बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाबाबत भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या दोघा कार्यकत्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न मंगळवारी (ता.१८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास केला. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गणेश पाटील आणि संतोष जाधव यांनी आत्महदहनाचा प्रयत्न केला. या संदर्भात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी निखील अमृतराव यांनी सांगितले की, नांदुरी येथील २०१६ मधील झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे कार्यालयात या संदर्भात अनेकवेळा तक्रारी दिलेल्या आहेत. तथापि तक्रारीची दखल लघुपाटबंधारे खात्याच्या तुळजापूर उपविभागाने घेतली नाही. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पंचायत समिती नजीकच्या लघुपाटबंधारे कार्यालयासमोर जमले आणि काय॔कत्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलीसांनी या संदर्भात अंगावर पेट्रोल ओतून घेणाऱ्या कार्यकत्यांना नोटीस दिली आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद यांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकत्यांना नोटीस दिल्याच्या माहितीस दुजोरा दिलेला आहे. तसेच लघुपाटबंधारे खात्याचे उपविभागीय अभियंता श्री होळकर यांनी या प्रकरणात सात दिवसांत चौकशी करण्याचे आश्वासन भ्रष्टाचार निर्मूलन समितीस दिले आहे.
#tuljapur #tuljapurnews #bribe #corruption #anticorruption #tuljapurnewsupdates