सातारा जिल्ह्यातील सहा नगर पंचायतीचे निकाल हाती आले आलेत. सातारा जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरशी केली आहे. परंतु, शशिकांत शिंदे यांना कोरेगावात धक्का बसला आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 52 उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, शशिकांत शिंदे यांच्या कोरेगावात राष्ट्रवादीला फक्त चारच जागांवर विजय मिळवता आला आहे. कोरेगावात राष्ट्रवादीच्या चार उमेदवारांचा विजय झाला आहे तर शिवसेनेने 13 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आमदार महेश शिंदे यांचा पॅनल कोरेगावात विजयी झाला आहे. लोणंद नगरपंचायतीत काँग्रेस चा पराभव करत आमदार मकरंद पाटील यांनी मैदान मारल्याचं चित्र पहायला मिळतय तर दहिवडीत भाजपा आमदार जयकुमार गोरे यांना धोबी पछाड करत राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख यांनी विजयी खेचुन आणलाय तर वडुज नगरपंचायतीत भाजपाने काठावर बहुमत मिळवलय मात्र अपक्ष ४ उमेदवार निवडुन आल्याने सत्ता कोण स्थापन करेल याकडे सर्वांच लक्ष लागुन राहिलय. खंडाळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीने १० जागांवर विजयी मिळवत भाजपा चा पराभव केल्याचं पहायला मिळतय राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा आणि लोणंद या ठिकाणी आपला करिष्मा दाखवलाय.