पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा मुंबईसह पुण्यातील वातावरणावर परिणाम दिसून आला
सकाळपासून पुण्यातील आणि नाजिकच्या गावांमध्ये दृश्यमानता अतिशय कमी झाल्याचे पाहायला मिळाले
धुळीचे वादळ पाकिस्तानातील कराची मध्ये आले होते
हे वादळ आता राजस्थान आणि गुजरातच्या दिशेने अरबी समुद्रामार्गे सरकत असल्याने वातावरणात सकाळपासून मळभ आणि धूळ दिसून येत आहे
पुण्यात देखील या वादळामुळे धुक्यासारखे वातावरण पाहायला मिळाला. शनिवारी रात्री पुण्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी देखील पडल्या
धुळीचे वादळ संपेपर्यंत श्वसनाचे विकार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे