आम्ही लोकशाहीचा अपमान केला? तुमचं गुलाम म्हणून असलेलं स्वप्न आम्ही मोडून पाडलं, म्हणजे लोकशाहीचा अपमान. आम्ही चोरुन मारुन शपथ नाही घेतली. उजेडात शपथ घेतली.. तुम्ही दिलेलं वचन मोडलं म्हणून आम्ही नवीन घरोबा केला. सरकार फोडून आमदार फोडून तुम्ही सरकार केलं. फोडाफोडी करुन सांगायचं की बघा आम्ही कसे लोकशाहीवादी आहोत, असे आम्ही नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.