राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाल्याने ते सध्या गृहविलगिकरणात आहेत. ते सध्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी असून ते घरीच उपचार घेत आहेत. विलगीरकणात असताना ते काय करतायत याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. सुप्रिया सुळे मुंबईतील वाय.बी चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी माध्यमांशी बोलत होत्या.