छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी श्वेता तिवारी भोपाळला आली होती. एका चर्चा सत्रात बोलताना श्वेता तिवारीनं आपल्या अंतर्वस्त्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. एका चर्चा सत्रामध्ये श्वेतानं 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वक्तव्य केलं. हे वक्तव्य तिनं गमतीत केलं असलं तरी या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. वेब सीरिजच्या प्रमोशननंतर अभिनेत्री श्वेता तिवारी मुंबईत परतली आहे.