Restoration of regular timings for Hotel, Restaurants in Mumbai?| हॉटेल, बार, रेस्टॉरंटच्या वेळा वाढणार?| Sakal
इंडियन हॉटेल अॅंड रेस्टॉरंट असोसिएशनच्या (Indian Hotel and Restaurant Association) शिष्टमंडळनाने आज मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या नियमित वेळा वाढवून देण्याची मागणी केली. आता कोविड नियमावलीनुसार रात्री १० वाजेपर्यंतच हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्सना डाइन-इन (Dine In) सुविधेची परवानगी आहे. रात्रीची वेळमर्यादा असल्यानं अनेक हॉटेल, बार, रेस्टॉरंट्समध्ये गर्दी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शिवाय होम डिलीव्हरी, टेकअवेसाठी (Home Delivery/Take Away) विशेष नियमावली करायची असल्यास तीही लागू करण्याची मागणी इंडियन हॉटेल अॅंड रेस्टॉरंट असोसिएशनतर्फे करण्यात आली. त्यावर आठवड्याभरात वेळा वाढवण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार, अशी प्रतिक्रिया अस्लम शेख यांनी दिली.