Anti-cut fencing installed at India-Bangladesh border l भारत-बांग्लादेश सीमेवर सुरक्षेचं नवं कुंपण
भारत-बांग्लादेश सीमेवरील (India - Bangladesh border) BSF म्हणजेच सीमा सुरक्षा दलानं (Anti Cut-Anti Climb fencing) अँटी कट-अँटी क्लाईंब फेन्सिंग (म्हणजेच कापता किंवा ज्यावर चढता येणार नाही असं कुंपण) बसवलंय. देशविरोधी आणि गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी भारतीय सीमा सुरक्षा दलानं हे महत्वाचं पाऊल उचललंय. अँटी कट फेन्सिंग हे अत्यंत मजबूत आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारं आहे. सहजरित्या कुणालाही हे फेन्सिंग कापता किंवा यावर चढणं अशक्य आहे. त्यामुळे आम्हाला सीमेवरील गुन्हेगारांशी दोन हात करताना मदत होईल, असं BSF चं म्हणणं आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात ४०९६ किमी अंतराची सीमा आहे, ज्यातील पश्चिम बंगालची २२१६ किमी इतकी आहे.
#IndiaBangladeshBorder #IndiaNewsUpdates #IndiaBorderUpdates #AntiCutAntiClimbfencing #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup