लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिष्मा तन्ना येत्या ५ फेब्रुवारीला वरुण बंगेरासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री करिष्मा तन्नाच्या मेंहदी समारंभासाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील हजेरी लावली आहे. अभिनेत्री करिष्माच्या हळदी आणि मेंहदी समारंभाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करिश्मा-वरुण यांचा विवाह दोन पद्धतीने होणार आहे. लग्न गुजराती आणि दक्षिण भारतीय परंपरेनुसार होणार आहे. मेहंदी सभारंभासाठी वरुणने मरून रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. त्याला मॅचिंग जॅकेटसुद्धा घातले होते. तसेच करिश्मा पिवळ्या बांधणीच्या प्रिंटेड लेहेंगा, भरतकाम केलेली चोळी आणि दुपट्ट्या घातला होता. यावेळी ते दोघेही सुंदर दिसत होते. सध्या सर्वच चाहते करिश्मा-वरुणच्या लग्नाच्या फोटोंची वाट पाहत आहेत.