मलायका अरोरा आणि अरबाज खान नुकतेच मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. दोघेही त्यांचा मुलगा अरहान खानला विमानतळावर निरोप द्यायला आले होते. अरहान गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शिक्षणासाठी परदेशात गेला होता. हिवाळ्याच्या सुट्टीत तो मुंबईत परतला होता, मात्र आता सुट्टी संपताच तो परदेशात जायला निघाला. यावेळी अरहानला जाताना पाहून मलायका आणि अरबाजने आपल्या मुलाला विमानतळावर मिठी मारली. यावेळी अरबाजने पांढरा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. त्याचवेळी मलायका ग्रे रंगाच्या ट्रॅकसूटमध्ये दिसली. अरबाज आणि मलायका बराच वेळ एकमेकांशी बोलताना दिसले. शेवटी त्यांनीही एकत्र मिठी मारली.