कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार छत्रपती शिवरायांची जयंती १९ फेब्रुवारीला होते. शिवजयंती जशी जवळ येऊ लागते, तसे रुईकर कॉलनीच्या समोरील फुटपाथावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांची विक्री सुरु होते. हे पुतळे घेण्यासाठी पंचक्रोशीतील लोक पुतळे घेण्यासाठी येतात. असे पुतळे तयार करण्यात राजस्थानी कलाकारांचा हातखंडा आहे. छोटा पुतळा पाच मिनिटात तर मोठा पुतळा एक ते दोन तासात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने ते तयार करतात. पुतळा तयार झाल्यानंतर पुतळ्याला रंग देणे, फिनिश करणे असे काम केले जाते. गेली ४५ वर्षे हा राजस्थानी समाजातील कारागिर राजांचा पुतळा तयार करत आहे.
(बातमीदार : अमोल सावंत)
(व्हीडीओ : बी. डी. चेचर)
#kolhapur #shivajimaharaj #shivajimaharajjayanti #shivjayanti #kolhapurnews