भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणखी 54 चिनी ॲप्सवर भारत सरकार बंदी घालणार असल्याची माहिती सूत्रांनी आज दिली आहे. 54 चायनीज ॲप्समध्ये ब्युटी कॅमेरा: स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा - सेल्फी कॅमेरा, इक्वलायझर आणि बास बूस्टर, कॅमकार्ड फॉर सेल्सफोर्स एन्ट, आयसोलॅंड 2: ॲप्शेस ऑफ टाइम लाइट, व्हिवा व्हिडिओ एडिटर, टेनसेंट एक्सरिव्हर, ओंम्योजी चेस, ओंम्योजी अरेना,ड्युअल स्पेस लाइट, ॲपलॉक यांचा समावेश आहे.