बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांनी 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्यानंतर आता संगीत क्षेत्राला आज पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. बप्पी लाहिरी यांचे मंगळवारी रात्री मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात निधन झाले आहे. निधनानंतर अभिनेत्री काजोल कुटुंबासह संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी पोहोचली. दुसरीकडे प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांनी देखली बप्पी लाहिरी यांच्या घरी जात शोक व्यक्त केला. दिग्दर्शक आणि सिनेनिर्माते राकेश रोशन, प्रसिद्ध गायक शान तसेच एकेकाळची गाजलेली अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी देखील हजेरी लावली. संगीतकार बप्पी लाहिरी यांनी अमर संगीत, आशा ओ भालोबाशा, अमर तुमी, अमर प्रेम, मंदिरा, बदनाम, रक्तलेखा, प्रिया या बंगाली चित्रपटांमध्ये हिट गाणी गायली होती. बप्पी लाहिरीने द डर्टी पिक्चर मधील ऊ ला ला, गुंडे मधील तूने मारी एंट्री, बद्रीनाथ की दुल्हनिया मधील तम्मा तम्मा हे हिटगाणी गायली आहेत. आपल्या वेगळ्या शैलीमुळे चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. या प्रवासात त्यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत.