अभिनेत्री आलिया भट गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या वर्ल्ड प्रीमियरसाठी सध्या बर्लिनमध्ये आहे. तिथल्या बर्लिनाले स्पेशल गालाज् मध्ये आलिया सहभागी झाली. त्यासाठीच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताहेत. आलियानं परिधान केलेल्या पांढऱ्या सुटमध्ये ती अतिशय सुंदर दिसतेय. संजय लीला भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडी सिनेमात आलियासोबत अजय देवगणही मुख्य भूमिकेत आहे.