मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सीचा शुभारंभ,उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ .१० ते ३० प्रवाशांची क्षमता असणाऱ्या ७ स्पीड बोटी .५६ प्रवासी क्षमता असलेली एक बोट, ८ बोटींद्वारे मुंबई ते नवी मुंबई जलवाहतूक चालणार.स्पीडबोटीकरिता प्रतिप्रवासी भाडे- ८०० रु. ते १२०० रु. कॅटामरामन बोटीकरिता प्रतिप्रवासी भाडे- २९० रु.मुंबई ते नवी मुंबई रस्तेमार्गे एक ते दीड तासाचं अंतर वॉटर टॅक्सीतून केवळ 35 मिनिटांत पार करता येणार. देशातील पहिल्या वेगवान मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण करण्यात आलं.
(Water Taxi starts from Mumbai to Navi Mumbai)