शिवप्रेमींमध्ये जल्लोष, जळगाव शहरात भगवे वातावरण

Maharashtra Times 2022-02-17

Views 250

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त जळगाव शहरात भगवे वातावरण दिसले. हातात भगवे झेंड्यांसह पारंपारिक वेशात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे महिलांनी रॅली काढली. शिवजयंती महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून शिवरायांच्या घोषणांनी परिसर धुमधुमला. शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. जळगावतील रॅली महोत्सवाला ४०० ते ५०० हून अधिक महिलांनी सहभाग दाखवला. छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय जिजाऊ जय शिवराय! अशा घोषणांनी शिवरायांचा जयघोष झाला. टॉवर चौक ते अश्वारूढ येथील शिवरायांच्या पुतळ्याजवळ या शिवज्योती रॅलीचा समारोप झाला. फुले मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माल्यार्पण केले. यावेळी अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत रॅलीचा जल्लोषात समारोप झाला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS