कर्नाटक उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश पदवीधर विद्यार्थ्यांसाठी लागू नाही, असे राज्याच्या उच्च शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट करूनही असे घडले, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले. कर्नाटक उच्च न्यायालयाने वर्गामध्ये हिजाबवर सरकारी बंदी विरोधात उडुपीमधील सरकारी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुस्लिम मुलींनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे.