वाशिम जिल्ह्यात पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना रिलायन्स पीक विमा कंपनी नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आल्या. त्यानंतर स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख दामू इंगोले यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख दामू इंगोले आक्रमक झाले. संबंधित कर्मचाऱ्याला त्यांनी चांगलाच चोप दिला. शेतकऱ्यांच्या समस्या लवकर सोडवल्या नाहीत तर यापुढे पीक विमा कंपनीचं ऑफिसही फोडण्याचा इशारा इंगोलेंनी दिला आहे.
#WashimNewsUpdates #WashimLiveUpdates #DamuIngole #SwabhimaniShetkariSanghatna #FarmingNews #Farmers #Shetkari #AgricultureNews #esakal #SakalMediaGroup