इंडियन आयडल मराठी ' हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे.श्रीवल्ली हे पुष्पा या सिनेमातलं गाणं सध्या तुफान गाजतंय.... या गाण्याचा गायक हा सिड श्रीराम असून तो तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा भाषेत गाणी गायली आहेत. पहिल्यांदाच एका मराठी कार्यक्रमात श्रीराम गाणं गाणार असून काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या युट्युब चॅनलवर अप्सरा आली या गाण्याचं कव्हर केलं होतं ज्याला प्रेक्षकांची विशेष पसंती देखील मिळाली होती.
आणि आता खुद्द अजय-अतुल समोर सिडने त्यांचं गाणं सादर केलं. मराठी कार्यक्रमाचं आदरातिर्थ घेऊन आणि इंडियन आयडल मराठीच्या स्पर्धकांची गाणी ऐकून सिडसुद्धा खुश झाला.