खडकवासला, ता.२५ : 'हर हर महादेव'चा गजर करीत 'बेल भंडारा' उधळून नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याचा जागर सिंहगडाच्या श्रीअमृतेश्वराच्या मेटावर रविवारी रात्री पार पडला. तान्हाजी व सूर्याजी ज्या वाटेने अष्टमीच्या रात्री गडावर आले. त्या दोन्ही वाटेचा रात्रीच्या अंधारातील थरार मावळ्यांनी अनभुवला.
जागरण गोंधळात बारा वाजता हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा जयघोष करीत बेलभंडारा उधळला. नरवीरांच्या शौर्याचे कथन जागरण गोंधळ्याने केले.
सिंहगडावर चढाई करण्यापूर्वी मालुसरेंनी खंडोजी नाईकांकडून गडावरील माहिती मिळवण्यासाठी श्रीअमृतेश्वराच्या मेटावर गोंधळ्याच्या वेशात जागरण गोंधळ केला होता. त्याची स्मृती म्हणून माघ वद्य अष्टमीच्या रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम येथील सरनाईक जोरकरांच्या वतीने आयोजन केले जाते.
जोरकर परिवारातील हरी जोरकर, माजी सरपंच दत्तात्रय जोरकर, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय जोरकर, भानुदास, अनिल, गणेश, दिपक, आदित्य, मारुती, सुनील, हरिश्चंद्र, स्वप्नील, राहुल, सुगंधा विश्रांती, कोमल, रंजना, हौसाबाई यांनी आयोजन केले होते.
ग्रामपंचायत सदस्य सारिका जोरकर, करिश्मा सांबरे, श्रीकांत पढेर जोरकरांचे नातेवाईक पढेर, लांघे, सुपेकर, सांबरे, सांगळे वारुंडे व खामकर उपस्थित होते.
शांताराम लांघी, गणेश वारूंडे, वैभव खामकर, नितीन वारूंडे, यांचा ही आयोजनात सहभाग होता. उद्योजक उदयसिंह शिंदे यांच्या विशेष सहकार्यातून हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला.
#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #Sinhgad #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup