पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित होते. मोदींनी रविवारी देखील युक्रेनच्या संकटावर एक बैठक घेतली होती.