रशिया आणि युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी संकटात सापडले आहेत. परभणी जिल्ह्यातील सहा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमधील संकेत पाठकचा ही समावेश आहे. तो ओडेसा या शहरातील विद्यापीठात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. युद्ध सुरु झाल्यानंतर संकेतसह 55 विद्यार्थी भारतात परतण्यासाठी प्रयत्न करित होते. या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जोखमीवर खाजगी बस करत ते मालदोवा देशात पोहोचले. युक्रेन सोडण्याआधी या 55 विद्यार्थ्यांनी भारताचे राष्ट्रगीत गायले. सध्या ते मालदोवा देशातील चिसीनऊ शहरातील विद्यापीठात राहत आहेत. मालदोवा सरकारने सर्व मुलांचं त्यांच्या कुटुंबियांशी फोनवरून बोलणं करून दिले. आता येथून बाहेर काढण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी भारत सरकारकडे मागणी केली आहे.