पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोध करण्याचा इशारा दिलाय. तरी, उद्याच्या मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलिसांकडून मॉक ड्रिल करण्यात आलं. यावेळी मोदींच्या ताफ्यात असणाऱ्या सर्व गाड्यांचा ताफा ज्या रस्त्यांवरुन जाणार, त्या सर्व रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रणासाठी आणि सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली.
#PMModiPuneVisit #NarendraModi #NarendraModiLatestNews #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup