अटक करण्यात आलेल्या अन्य नेत्यांमध्ये प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, नितीश राणे, मंगल प्रभात लोढा आणि निरंजन डावकरे यांचा समावेश आहे. नंतर अटक केलेल्या नेत्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी फडणवीस गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेत आंदोलन करत होते.