पिंपरी, ता. ११ : शहर व परिसरात शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. यामुळे नागरिकांची धांदल उडाली.
दुपारपासूनच उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ढग दाटून येऊ लागले. त्यानंतर काही वेळातच विजेच्या कडकडाटासह जोराचा वारा सुटला. पावसालाही सुरुवात झाली. अनेकजण रस्त्यातच अडकून पडले. कामातून सुटण्याच्या वेळीच पावसाला सुरुवात झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले
#rainfall, #rain, #monsoon, #maharashtra, #pimprichinchwad, #pimpri, #chinchwad,