पुणे महापालिकेची मुदत संपण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. नगरसेवकांनी त्यांच्या विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खराडी येथील ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरु असताना अजानचा आवाज ऐकू आला. हे लक्षात येताच अजित पवारांनी सुरु असलेले भाषण मध्येच थांबवले.