दहावीच्या परीक्षेत मुलांना कॉपी पुरवणाऱ्या औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील निलजगाव येथील लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेची अखेर मान्यता रद्द करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत विधानपरिषदेत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार महाराष्ट्र टाइम्सने समोर आणला होता.