राज्यासह देशात आज धुळवड मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसतेय. कोरोनामुळे दोन वर्षांपासून होळी, धुळवडीचे रंग फिके झाले होते मात्र यंदा निर्बंध कमी झाल्याने रंगाची उधळण होताना दिसतेय. आज पुण्यात सकाळपासूनच धुळवडीला सुरुवात झाली. यात लहान मुलांनी सकाळपासूनच रंग खेळायला सुरुवात केली. पिचकाऱ्या, फुगे यांच्यासह रंगाची उधळण करण्यात आज लहान मुलं मग्न झाली होती. विशेष म्हणजे यंदा लहान मुलांनी नैसर्गिक रंगावर आधिक भर दिलेला पाहायला मिळाला.
#HoliSpecial #Holi #PuneHoliNews #HoliFestival #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup