रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ..."आई कुठे काय करते"च्या सेट वरची आमची होळी आणि रंगपंचमी.अनेक वर्षापासून माझं रंगपंचमी खेळणे बंद झालं,
लहानपणी आम्ही डिलाईल रोड लोअर परेल दादर पोलिस कॉटर मध्ये आम्ही राहायचो,त्या भागामध्ये रंगपंचमी हा सण खूप धूमधडाक्यात खेळला जातो, मी खूपच मस्तीखोर होतो, सगळ्यांना रंग लावत फिरायचो, एकदा तर काही लोकांनी दारं उघडली नाहीत म्हणून गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीमध्ये रंग टाकले, तीन दिवस अख्या बिल्डिंगमध्ये रंगीत पाणी येत होतं, खूप बोंबा बोंब झाली, खूप फटके, खूप ओरडा पडला, पण एकदा पोरांनी oil paint ऑइल पेंट का सिल्वर Silver कलर माझ्या चेहऱ्याला आणि केसांना लावला,