आज संपूर्ण देशभर होळीचा सण साजरा होत आहे. एकमेकांना रंग लावून या सणाचा आनंद सगळेच घेत आहेत मात्र आपल्याकडे राजकीय रंगांची उधळण काही नवीन नाहीये. "राज्य सरकारला रंगच उरलेला नाही, सरड्यासारखं रंग बदलणारं हे सरकार आहे" असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे, त्या पिंपरी चिंचवड मधील होळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.