बीडमधील गुन्हेगारीबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, बीडमध्ये काय अवस्था झालीय हे मी सांगायची गरज नाही. बीडच्या आमदारांनी खुद्द लक्षवेधी मांडून सांगितलं बीडचा बिहार झाला आहे. पण हे मला आवडलं नाही. मी राष्ट्रीय लीडर आहे. बिहारला कमी माननं मला पटलं नाही. मी सुरूवातीपासून सांगत होते. बीडमध्ये माफीया आहे, वाळू तस्कर आहेत. प्रत्येक तक्रारीसाठी पोलीस राजकीय हस्तक्षेप घ्यायचे. आता बीडच्या एसपींना सुट्टीवर पाठवून नवीन एसपी द्यायचे ठरलं यातच सर्व आलंय. पण ही वेळ सत्ताधारी आमदारांवर आली हे दुर्दैव आहे, अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडेंचा समाचार घेतला आहे. वाळूच्या चुकीच्या उत्खननामुळे चार मुलं मेली. त्यावरही आमदारांनी विनोदी स्टेटमेंट दिलं हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे आधीच्या अपयशाचे परिणाम आहेत. आमच्याकडे बोट दाखवू नका. असेही त्यांनी ठणकावून सांगितले.