नितेश राणेंनी इम्तियाज जलील याच्या विधानावर महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “वाह..एमआयएमचीही महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी. कट्टरपंथींना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे. खरंच करून दाखवलं”, असं नितेश राणे यांनी यावेळी म्हटलं.