जगातील सर्वाधिक सोने खरेदी ही भारतात केली जाते. दागिन्यांविषयीचं प्रेम हे एक कारण, तर यामागे आहेच, पण सोन्यातली गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी चांगला परतावा देणारी ठरते. भारतात जगातील सर्वांत मोठा घरगुती सोन्याचा साठा आहे हे अभ्यासातून दिसून आलंय आहे. सोने ही रिअल इस्टेटसारखी एक प्रत्यक्ष मालमत्ता असली तरी वित्तीय किंवा डिजिटल गुंतवणूक मालमत्तांद्वारे त्याची चमक कमी होत नाही. सोने खरेदीची कारणं तर तशी बरीच आहेत, पण सोन्याला बाराही महिने झळाळी का आलेली असते याची कारणं आणि गुंतवणुकीच्या पद्धती या व्हिडीओत आपण जाणून घेऊ, ज्याने तुम्हालाही गुंतवणूक करताना फायदा होईल.