हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. नागपूरमध्ये येऊन समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी शिंदे यांनी केली. तसेच या महामार्गावर इलेक्ट्रिक कारचे सारथ्य करून त्यांनी फेरफटकाही मारला.