प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला असून प्रमोद सावंत यांच्यासह इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह इतर अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.