महापालिकेसारखा दर्जा असलेल्या दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे केंद्रासोबतचे प्रेमसंबंध हा आजवर सर्वसामान्य जनतेच्या कुतूहलाचा विषय होता. आता या पक्षाला पंजाबची सत्ता मिळालीय. तिथं हा पक्ष कशी सत्ता राबवणार ? अशी उत्सकता असताना पंजाब सरकार आणि केंद्रातील वादाचा पहिला अंक समोर आलाय. एप्रिलपासून पंजाबमध्ये #गहू लागवडीचा हंगाम सुरु झालाय. या हंगामातील गहू लागवडीसाठी म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १७५० कोटी रुपयांचा ग्रामीण विकास निधी (Rural Development Fund) मागितला अन सोबतच एक एप्रिल ते ३१ ऑक्टोबर दरम्यान वापरण्यासाठी ७५० मेगावॅट अतिरिक्त वीज देण्यात यावी, अशी मागणी केली. केंद्राने या मागण्या मान्य करण्यास नकार दिला अन इथेच पंजाबमधील सत्ताधारी #आमआदमीपक्ष अन केंद्रात सत्ताधारी भारतीय जनता पक्षात वादाची ठिणगी पडलीय. #Sakal #Sakalagrowon #AgrowonforFarmers