2 वर्षांनंतर निर्बंधमुक्त झालेल्या महाराष्ट्र राज्यात आज गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुण्यात देखील या निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी नववर्षाच्या स्वागताला पुण्यात मोठा उत्साह दिसला. या वेळी ढोल ताशांच्या गजरात शोभा यात्रा काढण्यात आली. यात महिलांसह लहान मुले देखील सामील झाले होते.
#GudiPadwa2022 #GudiPadwa #GudiPadwawishesinMarathi #GudiPadwainMarathi #GudiPadwaImages #GudiPadwaVideos #esakal #SakalMediaGroup