ईडी नं कारवाई केलेल्या नागपुरातील वकील सतीश उके यांच्या समर्थनार्थ नागपूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या सदस्यांनी आज आंदोलन केलं. सतीश उके हे ज्या लोकांविरुद्ध खटले चालवीत होते त्यांनी जाणीवपूर्वक केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून ही कारवाई केल्याचा आरोप यावेळी वकिलांनी केला. हा प्रकार म्हणजे वकिलांचा आवाज दाबण्याचा प्रकार असून आम्ही सतीश उके यांच्यासोबत आहोत, आणि या कारवाईला विरोध करत राहू, असं यावेळी वकिलांनी सांगितलं.
#Sakal #SatishUke #ED #DevendraFadnavis #UddhavThackeray #NCP #BJP #newtoday #NewsHindi #BreakingNewsToday